Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

नागपूर येथे “पोलीस सखी/Buddy Cops” या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन

 

दिनांक ११ जुलै २०१७ रोजी चिटणवीस सेंटर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे “पोलीस सखी/Buddy Cops” या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करताना, नागपूर शहर पोलीसातर्फे शहरातील शाळा, कॉलेज, आश्रमशाळा, हॉस्टेल, मदरसा येथील मुलींच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे काम या उपक्रमाद्वारे करण्यात येईल.

कार्यक्रमास नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. श्री. के. व्यंकटेश, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. प्रतापसिंग पाटणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. शिवाजीराव बोडखे, पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडेकर उपस्थित होते.

नागपूर पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,887