Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

Inaugurated of All Ladies League, Aurangabad Regional Branch by the Chairperson of Maharashtra State Commission for Women smt Vijaya Rahatkar ji

ऑल लेडीज लीग (ALL) या जागतिक पातळीवरच्या महिला समूहाच्या औरंगाबाद विभागीय शाखेचे उद्घाटन काल एमजीएमच्या आईनस्टईन सभागृहात महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते पणती प्रज्वलित करून झाले.

एक अभिनव सुरवात म्हणून भाषणाऐवजी मा. विजया रहाटकर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून याप्रसंगी उपस्थित महिलांना प्रेरित करणारा संवाद साधण्याची कल्पकता आयोजक समितीने दाखवली. विजया रहाटकर यांनी सांगितले की महिलांनी स्वत:मधे अंतर्भूत असलेल्या सकारात्मकतेने स्वत:ला सिध्द करावे. त्याचप्रमाणे आपली शक्ती ओळखून कार्यरत राहिल्यास त्याचे चांगलेच परिणाम दिसून येतात. शिवाय कुटुंबाचा प्रेरणादायी सहभाग, मदत मिळाल्यास महिलांची वाटचाल अधिक सुकर, सहजसोपी होते असेही त्या म्हणाल्या. मनमोकळे, सहज सुलभ विचार, सकारात्मक मार्गदर्शन यामुळे रहाटकरांची ही मुलाखत चांगलीच रंजक ठरली.
कार्यक्रमात डॉ. निधी नावंदर, डॉ. तृप्ती बोरूळकर आणि डॉ. अरुणा शहा कराड व अन्य मान्यवर विशेष उपस्थित होते.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,902