Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

Inauguration of Departmental Council at Aurangabad by Chairperson of Maharashtra State Commission for Women smt Vijaya Rahatkar ji

 

पंचायत राज्य संस्थांना बळकट करणारया ७३व्या आणि ७४ व्या राज्यघटना दुरुस्तीस पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार, दि. २२ जानेवारी) औरंगाबादमध्ये विभागीय परिषद आयोजित केली होती. तिचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले. प्रामुख्याने चर्चा होती लोकशाही निवडणूक आणि सुशासन यांच्या संदर्भात. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय मिळविले आणि काय बाकी आहे, याचे सिंहावलोकन करण्यास ही उत्तम संधी होती. उदघाटनाच्या भाषणामध्ये विजया रहाटकर यांनी पंचायत राज्य संस्थांचा सर्वंकष आढावा घेतला. सरकारे आणि या संस्था यांच्यातील आर्थिक अन्योन्य संबंधांपासून ते 'उज्ज्वला', 'मुद्रा'यासारख्या सुशासन योजनांपर्यंतचा वेध त्यांनी मांडला. एकूणच ही परिषद विचारांना चालना देणारी ठरली. विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घडोले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी पाटील- डोणगावकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी.ए. चोपडे, डी.एम. मुगळीकर, मधुकरराजे अर्दंड, के.एम. नागरगोजे, वर्षा ठाकूर- घुगे, पारस बोथरा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने, पुढाकाराने झालेल्या या परिषदेचे फलित नक्कीच चांगले असेल...

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,964