| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

WOMEN COMMISSION'S SILVER JUBLIEE CELEBRATION.


महिला आयोगाचा रौप्यमहोत्सवी सोहळा...


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन गुरूवार (दि. २५ जानेवारी) आयोगाच्या मुंबई कार्यालयात संपन्न झाला. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सदस्या नीता ठाकरे, देवयानी ठाकरे, गयाताई कराड, विंदा कीर्तिकर, अॅड आशा लांडगे, आयोगाच्या सदस्य सचिव डॉ मंजुषा सुभाष मोळवणे हे तर उपस्थित होतेच; पण त्यांच्या जोडीला एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ शशिकला वंजारी, म्हाडाचे सीईओ सुमंत भांगे आणि भाजपचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भ


ुसारी हे देखील आवर्जून उपस्थित होते. पण सर्वांत महत्वाचे म्हणजे अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीदेखील आयोगाच्या या अनौपचारिक सोहळ्याला उपस्थित होते.


महिलांना घटनात्मक अधिकार मिळवून देणे तसेच त्यांच्या आर्थिक सामाजिक सक्षमीकरणासाठीआयोग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. मुस्लिम महिलांचे घटनात्मक अधिकार त्यांना मिळवून देणे, अॅसिड हल्ला पीडिता तसेच अनाथ मुलांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी शासन सर्वतोपरी काम करत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांना न्याय, आर्थिक तसेच सामाजिक बळकटी देणे यासाठी कार्यरत आहेच. भविष्यात महिलांविषयक कायद्याचे ज्ञान शेवटच्या स्तरातील महिलेपर्यंत पोहोचावे यासाठी आयोग काम करेल, असे विजया रहाटकर म्हणाल्या.


महिला आयोगाचे काम सर्वदूर पोहोचावे तसेच महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणाच्या उद्दिष्टने सुरु करण्यात आलेल्या ‘साद’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


खरे तर मुख्य औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन नंतर केले जाणार आहे. पण २५ जानेवारी हा दिवस वर्धापनदिन असल्याने अनौपचारिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यातील काही क्षणचित्रे...



u-2
u-2
u-2

u-2
u-2
u-2

u-2
u-2
u-2

u-2