Home / Initiatives
आरोग्य वारी २०२४
दिनांक ३०.०६.२०४ रोजी निवडुंग्या विठोबा मंदिर, नानापेठ, पुणे राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित आरोग्यवारीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री सहकार, नागरी विमान वाहतूक मा.ना.श्री. मुरलीधर मोहोळ,महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.ना.कु. आदिती तटकरे, आयोगाचे अध्यक्ष मा श्रीमती रूपाली चाकणकर, सदस्य सचिव माया पाटोळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची आषाढी व कार्तिकी वारीची शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. राज्यात वारकरी संप्रदायाचा समृध्द सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आषाढी व कार्तिकी वारी कालावधीत पालखी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणात असल्याने महिलांसाठी महिला आयोगाच्या वतीने दरवर्षी आरोग्यवारी हा उपक्रम राबविला जातो.
या आरोग्यवारीमध्ये महिलांसाठी प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर सॅनिटरी पॅड वेंडींग व बर्णींग मशीन, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, वृध्द महिला भगिनिंसाठी विसावा कक्ष, महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम, महिला भगिनींसाठी मोबाईल टॉयलेट व न्हानी घर,महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक, महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक व जनजागृतीसाठी माहिती दर्शक स्क्रीन, महिलांसाठी प्राथमिक आरोग्य तपासणी कक्ष आदी सुविधांची पूर्तता या आरोग्यवारीत करण्यात येत आहे.