Home / Initiatives
१२ जून २०२४
आज महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविषयी बैठक झाली. यावेळी राज्य महिला आयोगाकडून जिल्हास्तरावर घेण्यात येणारी महिला आयोग आपली दारी जनसुनावणी, विधवा प्रथा बंदी साठी ग्रामसभामधील ठराव, सायबर सुरक्षेसाठी मेटा सोबत सुरू असलेला मिशन ई सुरक्षा उपक्रम आदी बाबत मा. मंत्री महोदयांना अवगत करण्यात आले. लवकरच आषाढी वारीला सुरुवात होत असून या वारीत पायी चालणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांसाठी राज्य महिला आयोग गेली दोन वर्ष राबवत असलेल्या 'आरोग्य वारी' उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विठ्ठलाच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी आयोग करत असलेल्या कामाची माहिती देत प्रशासनाकडून अपेक्षित कामाविषयी उपस्थित अधिकाऱ्यांना अवगत केले.
मंत्री महोदयांनी आरोग्य वारीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागाचे पूर्ण सहकार्य राहील याबाबत आश्वस्त केले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार, महिला व बालविकास आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे, आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे आणि सबंधित अधिकारी उपस्थित होते.