Home / Initiatives
५ जानेवारी २०२४,
पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्डचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पाठपुराव्याने सुरू करण्यात आलेल्या या वॉर्डच्या माध्यमातून समाजातील या वंचित घटकाला केवळ आरोग्य सुविधाच उपलब्ध होणार नसून खऱ्या अर्थाने जगण्यासाठी नवी उमेद आणि ऊर्जा प्राप्त होईल.
या कार्यक्रमासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसनजी मुश्रीफ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे, मा. आ. सुनीलजी कांबळे, अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी श्री. डॉ. राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक मा. श्री. दिलीप म्हैसकर, चांदणीताई गोरे, बी.जे. मेडीकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठता मा. डॉ. विनायक काळे यांची उपस्थिती होती.