Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत आज जळगाव जिल्ह्याची जनसुनावणी आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी घेतली.
जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे झालेल्या सुनावणीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
सचिव सय्यदजी, जिल्हा महिला बालविकास
अधिकारी वनिता सोनगत उपस्थित होते. एकाचवेळी तीन पॅनल तयार करून आजच दाखल झालेल्या एकूण ९४ प्रकरणांवर कार्यवाही
करण्यात आली. कौटुंबिक छळ, पोलिसांकडून झालेले दुर्लक्ष, प्रशासकीय अडचणी अशा स्वरूपाच्या केसेस आज सुनावणीला आल्या होत्या.