Home / Initiatives
आज २७ जून २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने "महिला आयोग आपल्या दारी" जनसुनावणी उपक्रम जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे पडला.
याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील तरुणींच्या, महिलांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेत त्यात तत्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या. या उपक्रमाला सातारा जिल्ह्यातील महिला -भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रतिसाद दिला.
यावेळी एकूण २६० तक्रारींवर सुनावणी घेतली. यात समुपदेशनाने मन परिवर्तन होऊन पुन्हा नांदण्यास तयार झालेल्या २ जोडप्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
आयोगाचे अध्यक्ष मा श्रीमती रूपाली चाकणकर, जिल्हाधिकारी मा.श्री.जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक मा.श्री. समीर शेख,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती. एन.एन.बेदरकर, महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई सचिव, सदस्य मा. श्रीमती माया पाटोळे,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. विजय अं. तावरे, महिला आयोग समन्वयक मा.मनिषा बर्गे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.