Home / Initiatives
पोषण माह चे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकाशगड सभागृह येथे पोषक आहार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. रेखा दिवेकर यांनी अतिशय सोप्या, ओघवत्या भाषेत पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिले. संपुर्ण कुटुंबाचे पोषण आपली तृण, पारंपरिक खाणे यांच्या साहाय्यानेच शक्य आहे यावर त्यांचा भर होता.उपस्थित सर्वांनी सक्रिय सहभाग घेत त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, सदस्य ऍड गौरी छाब्रिया, सदस्य सचिव माया पाटोळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. मा. कु. आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री, महिला व बालविकास यांनी ऑनलाइन सहभागी होत उपस्थितांशी संवाद साधला.