Home / Initiatives
जिल्हास्तरावरील महिला व बालकांचे प्रश्न, राज्य तसेच केंद्र शासन राबवित असलेल्या योजनांची अंमलबजावणी यादृष्टीने आज वर्धा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. विकास भवनात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, आयोगाच्या सदस्या आभा पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे, विधी सेवा प्राधिकरणाचे देशमुख, महिला व बाल विकास विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास, कामगार, शिक्षण, परिवहन, आरोग्य, पोलिस अशा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या कामाची माहिती सादर केली.
वर्धा शहरातील नागरिकांना शासनाच्या विविध सेवा घरपोच देण्यासाठी जिल्हाधिकारी राबवित असलेला, राज्यातला प्रायोगिक तत्वावरचा पहिलाच उपक्रम “सेवादूत” अनुकरणीय आहे.
बचत गटांच्या महिलांना व्यावसायिक कौशल्य देण्यासाठी होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहे. वर्धाच्या “वर्धिनी” ब्रॅन्डने चांगले स्थान कमावले आहे. असे प्रयत्न, प्रोत्साहन राज्यातील सर्व बचत गटांसाठी व्हायला हवे.
जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मिसिंग केस साठी होणारा तपास चांगला आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी असलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्याची आकडेवारी असमाधानकारक आहे, याबाबत ८ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश कामगार विभागाला देण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी असलेली समुपदेशन केंद्र काही कारणांमुळे बंद झाली आहेत ती पुनर्जिवीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.