Home / Initiatives
दिनांक १०/०६/२०२३ रोजी , राज्य महिला आयोगाच्या वतीने आषाढी वारीला पायी जाणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या आरोग्यवारी अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री आ.श्री.चंद्रकांतदादा पाटील, आ.श्री.रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक १०-१२ किलोमीटर वरती सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष असून वृद्ध वारकरी महिलांसाठी विसावा कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. वारीमधील महिला वारकऱ्यांच्या कपडे बदलण्याच्या सोयीच्या दृष्टीने चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्भयापथक २४ तास उपलब्ध असणार आहे.
महिलांच्या आरोग्याची समस्या हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने वैद्यकीय पथकाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कुटुंबापासून लांब असणाऱ्या वारकरी महिलेला आरोग्याच्या समस्येचा त्रास व्हायला नको या उद्देशाने अविरत आरोग्य सेवा दिली जाणार आहे.
महिला आयोगाचे आरोग्यवारी अभियान महिलांच्या सर्वांगीण सेवेसाठी तत्पर आहे.!