Home / Initiatives
अकोला जिल्हा दौरा दरम्यान आढावा बैठक घेत जिल्ह्यात महिलांकरिता असलेल्या योजनांची अंमलबजावणी, स्वच्छतागृह, अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापना, बालविवाह रोखण्यासाठी केलेले प्रयत्न आदींची माहिती घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीला आमदार अमोलजी मिटकरी, आयोगाच्या सदस्या आभा पांडे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांची उपस्थिती होती. महिला व बालकल्याण, आरोग्य, पोलीस, परिवहन, शिक्षण विभाग यांनी आपल्या माहितीचे सादरीकरण केले.