| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

आढवा बैठक - बुलडाणा


बुलडाणा जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यापूर्वी आज जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटर आणि बुलडाणा शहर एस.टी आगारातील स्वच्छतागृहाची पाहणी केली. वन स्टॉप सेंटरचे काम अतिशय चांगले आहे. त्यांना अजून बळ द्यावे असे जिल्हाधकारी डॉ.किरण पाटील यांना सांगितले. आढावा बैठकीस उपस्थित एस.टी महामंडळाच्या बुलडाणा व्यवस्थापकांना तातडीने स्वच्छतागृह वापर योग्य करून त्याचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले.

आढावा बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी आपला अहवाल सादर केला, कामाचे सादरीकरण केले. त्यामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती खाजगी कार्यालयात नाहीत याबाबत तातडीने कारवाई करत १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश कामगार विभागाला देण्यात आले आहेत. जिल्हयात ४९ ऊसतोड कामगार महिलांची नोंद आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर आवश्यक ती कारवाई करत त्याबाबतची माहिती आयोगास पाठवण्यास सामाजिक न्याय विभागाला सांगण्यात आले आहे.

सदस्या आभा पांडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधिक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, महिला व बालकल्याण उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमोल डिधुळे यांच्यासह सर्व विभागांचा आढावा घेतला.

u-1
u-1
u-1

u-1
u-1