Home / Initiatives
10 फेब्रुवारी 2022 रोजी नंदुरबार येथे 'महिला आयोग आमच्या दारी' उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या जिल्ह्यात न्याय मिळावा यासाठी 'जनसुनावणी' घेण्यात आली. आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातही याला मोठा प्रतिसाद मिळाला. या जनसुनावणीत कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांची संख्या जास्त होती. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी दोन पॅनल नेमण्यात आले होते. या पॅनलमध्ये राज्य महिला आयोगाच्या सदस्य धुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विधी व न्याय विभागाचे अधिकारी, समुपदेशक, वकील यांचा समावेश होता. जनसुनावणीद्वारे महिलांच्या समस्या आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग नेहमीच कटिबद्ध आहे.