Home / Initiatives
सदर घटनेची आयोगाने स्वाधिकारे दखल घेवून साकीनाका पोलीस स्टेशन येथील तपास यंत्रणा यांच्याशी संपर्क साधून सदर पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहार करण्यात आला व तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश आयोगाने दिले. त्याचप्रमाणे परिमंडळ १० चे पोलीस उप-आयुक्त यांच्याशी संपर्क साधून या घटनेची सद्य:स्थिती यावेळी जाणून घेण्यात आली. त्याचप्रमाणे या घटनेकडे आयोगाच्या सदस्य सचिव व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. दि.११.०९.२०२१ रोजी आयोगाच्या सदस्य सचिव व महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचेसमवेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या मा.सदस्या यांच्याशी चर्चा करुन घटनेचा तपास शीघ्र गतीने पूर्ण होणेकरिता निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात आले.