Home / Initiatives
दि. २३/११/२०२१ रोजी मा. अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला अयोग्य यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजयजी पांडे यांची भेट घेतली. यावेळी बालविवाह, महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या दक्षता कमिटी, भरोसा सेल, निर्भया पथक, कामाच्या ठिकाणी होत असलेला मानसिक व शारीरिक छळ, माझ्या महिला, युवती, नोकरदार भगिनी यांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या हेल्पलाईन, तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणी, काही ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून तपासासाठी होत असलेली दिरंगाई अशा अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली.