Home / Initiatives
बीड जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने त्यांचे प्रश्न घेउन आल्या होत्या. त्यांचे याच ठिकाणी समाधान व्हावे, पुढील कारवाई वेगाने व्हावी यासाठी संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या. एकाच वेळी तीन पॅनेल तयार करुन आज एकुण ४६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यावेळी माझ्या सहकारी सदस्या ॲड संगीता चव्हाण, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, सीईओ अजित पवार, उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर आर तडवी उपस्थित होते.