Home / Initiatives
रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आणि नवीन सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिलीच बोर्ड मिटिंग होती. या मिटिंगमध्ये आगामी काळात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी आयोग घेत असलेले विविध निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाली. यावेळी अध्यक्षा रुपाली चाकणकर ,आयोगाचे सदस्य तसेच राज्याचे पोलीस महासंचालक संजयजी पांडे यांची उपस्थिती होती.