Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या जिल्हास्तरावर राबविण्यात येणाऱ्या "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत १४ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा दौरा केला. महिलांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रथम जनसुनावणी घेतली. चार पॅनेलच्या माध्यमातून १५२ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. आयोगासमोर आलेल्या तक्रारीमध्ये सर्वात जास्त तक्रारी या कौटुंबिक कलहाच्या होत्या. पती पत्नी आणि दोन्ही कुटुंबात सामंजस्य राहण्यासाठी समुपदेशनाची मोठी गरज आहे असे यावेळी श्रीमती चाकणकर यांनी सां महाविद्यालयाचे विद्यार्थी, म्हाडा, माविम कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सुनावणी वेळी समुपदेशन करून पुन्हा संसार करण्यासाठी एकत्रित आलेल्या एकूण १४ जोडप्यांना मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर जिल्ह्यातील महिलांच्या व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस, कामगार, शिक्षण, आरोग्य, परिवहन अशा विविध विभागांची आढावा बैठक श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे तसेच बालविवाह प्रमाण मोठे आहे यासाठी सर्व यंत्रणांना एकत्र येत व्यापक जनजागृती करावी लागणार आहे.
पोलिसांचे पिंक पथक, दामिनी पथक चांगले काम करत आहे. बालविवाह रोखण्यासाठी केटरर्स, ब्युटी पार्लर, शाळा महाविद्यालयातील मुलांना जागरूक करण्यात येत आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले. आणि याचे गेल्या एक दोन वर्षात चांगले परिणाम दिसल्याचे त्यांनी मांडलेल्या आकडेवारीतून दिसून आले. असे उपक्रम स्तुत्य आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम, बैठक यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे, सहायक आयुक्त सुभाष भुजंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण सुवर्णा जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमणरे, उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे उपस्थित होते.