Home / Initiatives
महाराष्ट्र शासनाने व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगा यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व ४ प्रभागातील नागरिकांनी काल दि.९ जून रोजी एकाच दिवशी विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक असा ठराव मंजूर केला