Home / Initiatives
25 जैनवरी रोजी महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव यावेळी करण्यात आला. तसेच राज्य महिला आयोग आणि फेसबुक, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ आज झाला. तसेच International justice mission आणि महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने समाज आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील समन्वयासाठी टुलकिटचे प्रकाशन करण्यात आले. आयोगाच्या वर्ष २०२३ च्या कँलेंडर, डायरीचे प्रकाशन देखील करण्यात आले.
यावेळी बंदरे आणि खाणीकर्म मंत्री दादा भुसे , महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती कुंदन , IG(PCWC) दीपक पांडे आयोगाचे सदस्य , सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी तसेच आयोगाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.