Home / Initiatives
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आज औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून 'जनसुनावणी' घेतली याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या जनसुनावणी वेळी कौटुंबिक हिंसाचार, मालमत्तेच्या प्रश्नांबाबतच्या प्रकरणातील केसेसची संख्या जास्त होती. या सर्वांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तीन पॅनेल नियुक्त केले होते. या पॅनेल्समध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक , विधी व न्याय खात्याचे अधिकारी , समुपदेशक , वकील यांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य महिला आयोग जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.