Home / Initiatives
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत झालेल्या सुनावणीस पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिवाजीराव शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एच निपाणीकर, विधी सेवा प्राधिकरणाच्या वैशाली धावणे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनिल अंकुश उपस्थित होते.
महिलांना स्थानिक पातळीवर तातडीने न्याय मिळावा यासाठी जिल्हास्तरावर जनसुनावणी घेण्यात येते. उस्मानाबाद जिल्हा सुनावणीत आज नव्याने दाखल ६३ तक्रारींवर सुनावणी घेतली. ज्या महिलांच्या समस्यांचे आज निराकरण झाले नाही अशा प्रकरणात ८ दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.