Home / Initiatives
येथे उभारण्यात आलेल्या महिला मदत कक्षाचे उदघाटन राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या मदत कक्षामध्ये विसावा कक्ष व हिरकणी कक्ष असे दोन विभाग करण्यात आले असून यामध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन , बर्निंग मशीन अशी सुविधा करण्यात आलेली आहे. यावेळी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.अभिनव देशमुख , महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी शर्मा , पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.खेमणार , उपायुक्त आशा राऊत व इतर सरकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.