Home / Initiatives
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत आज कोल्हापूर जिल्ह्यात जनसुनावणी घेतली. महाराणी ताराराणी सभागृहात झालेल्या सुनावणीच्या वेळी ९१ तक्रारी प्राप्त झाल्या. यात सर्वाधिक केसेस या कौटुंबिक छळ, त्रासाच्या होत्या. यावेळी माझ्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सीईओ संजयसिंह चव्हाण, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी शिल्पा पाटील उपस्थित होते. पोलीस, प्रशासन, विधी सेवा, समुपदेशक असलेले तीन पॅनल तयार सर्व केसेसचा निपटारा करण्यात आला. पाच कौटुंबिक केसेसच्या प्रकारांमध्ये समेट घडवून आणून पाचही जोडपी पुन्हा सुखाने नांदावीत यासाठी समुदेशन करण्यात आले. या जोडप्याना भावी आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या