Home / Initiatives
जिल्हास्तरावरील महिला व बालकांचे प्रश्न, राज्य तसेच केंद्र शासन राबवित असलेल्या योजनांची अंमलबजावणी यादृष्टीने आज कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सीईओ संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास, कामगार, शिक्षण, परिवहन, आरोग्य, पोलिस अशा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या कामाची माहिती सादर केली.
निर्भया पथकाने महिलंच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हयातील हॉटस्पॉट व्हिजिट सतत करण्याचा उपक्रम चांगला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळातून मुलींसाठी राबवला जाणारा नन्ही कली उपक्रम मुलींच्या शिक्षणाला बळ देणारा आहे. कोविड विधवा, परित्यक्ता महिलांना रोजगार देण्याच्या कामाचं ही कौतुक आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी असलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अंमलबजावणीबाबत ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. बालविवाह होणे शाहूंचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरला भूषणावह नाही. बाल विवाह रोखण्यासाठी, मुलींचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे. यादृष्टीने ही बैठकी दरम्यान निर्देश दिले.
एसटी महामंडळाच्या सर्व आगारात, स्थानकात असलेल्या महिला स्वच्छतागृहाबाहेर महिलाच केअर टेकर असायला हवी यासाठी तातडीने कारवाई करण्याबाबत परिवहन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.