सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोग कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सावित्रीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधत आज महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी सह मानसिक स्वास्थ्य, स्तनांचा कर्करोग याविषयी मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यावेळी आयोगाच्या सदस्या ॲड गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते यांच्यासह डॅा सागर मुंदडा, डॅा विकास गुप्ता, लायन्स इटंरनॅशनलचे श्री चुरी आणि तज्ञ डॅाक्टर उपस्थित होते.
डोळे, रक्त शर्करा, हाडांचा ठिसूळपणा आदी विविध तपासणीसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.