१८ /११/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील लीगल एड क्लिनिकचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.
यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा, राज्याचे महिला व बाल विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे , आयोगाच्या सदस्या अँड संगीता चव्हाण, गौरी छाब्रिया आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती श्रद्धा जोशी, महाराष्ट्र राज्य
विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री. डी. पी. सुराणा , जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगरच्या अध्यक्षा स्वाती चौहान उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना कायदेविषयक सल्ला विनामूल्य देणारे लीगल एड क्लिनिक सुरु झाले असून यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमधे आयोगाकडून तज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर मदत याठिकाणी मिळेल तरी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मान्यवर उपस्थतितांकडून करण्यात आलेी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मान्यवर उपस्थतितांकडून करण्यात आले