| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

लाॅकडाउनमधे समुपदेशनाकरिता महिला आयोगाकडुनहेल्पलाईन.


मुंबई २९ मार्च, - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या लाॅकडाउनच्या काळात मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पोद्दार फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत समुपदेशन हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषांमधे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत या हेल्पलाईन वर संपर्क करता येतो. ही सुविधा मोफत असून स्त्री पुरुष कुणीही संपर्क करु शकतात. १८००१२१०९८० या क्रमांकावर प्रशिक्षित समुपदेशकांशी संवाद साधता येईल.

लाॅकडाउनच्या काळात मानसिक स्वास्थ्य जपणे या हेतुने सदर हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. आपल्याला ताण, तणाव, चिडचिड होणे, भीती वाटणे, सतत मुड बदलणे असे त्रास होत असल्यास या काळात आपण या हेल्पलाईनचा उपयोग करु शकतो असे आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लूथरा यांनी सांगितले.


u-1