Home / Initiatives
राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमासाठी विदर्भ दौऱ्यावर असताना १२ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्यात जनसुनावणी घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या सुनावणीला आमदार अमोलजी मिटकरी, आयोगाच्या सदस्या आभा पांडे, अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, बाल हक्क आयोगाचे सदस्य ॲड. संजयजी सेंगर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, विधी सेवा प्राधिकरणचे ॲड. जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कौलखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर आदी उपस्थित होते.
अकोला जिल्हयातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सुनावणीला येत आपले प्रश्न आयोगासमोर मांडले. तीन पॅनल तयार करून आज एकूण १६९ तक्रारींवर सुनावणी घेतली. कौटुंबिक छळ, पोलीसांनी महिलांच्या प्रकरणांत संवेदनशीलता न दाखवणे, प्रशासना विरोधात तक्रारी, अनुकंपा नोकरीचे प्रश्न असे विविध विषय महिलांच्या तक्रारीचे होते.