Home / Initiatives
पोलिस, प्रशासन, आरोग्य, शिक्षण, परिवहन, कामगार अशा विविध विभागांचा आढावा घेतला बीड जिल्ह्यातील बालविवाह रोखणे, हुंडाबळी थांबवणे यासाठी भरीव काम करावे लागणार आहे. बीड जिल्हा मोठा आहे तेव्हा अंबेजोगाई, आष्टी तालुक्यात नवीन स्वाधारगृह करावे, गर्भलिंग निदान रोखणेसाठी धडक मोहिम राबवावी अशा सुचना यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.