Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने
राज्यभरातील महिलांना सायबर सुरक्षित करण्यासाठी
आयोजित मिशन ई सुरक्षा उपक्रमांतर्गत १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.
व्यासपीठावर आयोगाच्या सदस्या आभा पांडे, उत्कर्षा रूपवते, संगीता चव्हाण, दीपिका चव्हाण आणि सदस्य सचिव माया पाटोळे, मेटा च्या तज्ञ अश्विनी देसाई आदी उपस्थित होते.
नागपुरातील विविध महाविद्यालयीन तरुणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. महिलांना सायबर मध्ये होणारे गुन्हे,
ते टाळण्यासाठी करायचे उपाय, चुकीची घटना घडल्यास घ्यायची यंत्रणाची मदत, सोशल मीडियाच्या विविध अकाउंट्स बाबत घ्यावयाची काळजी याबाबत मेटा च्या तज्ञांनी सखोल मार्गदर्शन यावेळी केले.