Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि उपसभापती कार्यालय, विधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, राज्य महिला आयोगाच्या ३० वर्षाच्या कालावधीत प्रथमच १३ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनात महिला आमदारांना सायबर सुरक्षित करणारा मिशन ई सुरक्षा कार्यक्रम पार पडला.
मा. नीलम गोऱ्हे, उपसभापती विधान परिषद, मा. आदिती तटकरे, मंत्री, महिला व बालविकास यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, सीमा हिरे, मोनिका राजळे, नमिता मुंदडा, लता सोनवणे, यामिनी जाधव, प्रणिती शिंदे, श्वेता महाले, ऋतुजा लटके, मनीषा कायंदे, सरोज अहिरे उपस्थित होत्या.
विधिमंडळातील महिला लोकप्रतिनींधीसह अधिकारी, पत्रकार यांनी सुद्धा कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. सायबर गुन्हे तपास तज्ञ श्री. संदीप गादिया यांनी अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन यावेळी केले.
#महिला #आयोग #विधान #भवन #नागपूर