Home / Initiatives
*नागपूर, दि. 18* - महिलांवरील अत्याचार दूर करणे आणि बालके व महिलांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्यशासनाची प्राथमिकता आहे. यासाठी राज्य शासन विविध उपक्रम व योजना राबवित आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी जनजागृती घडवूया आणि एकजुटीने पुढाकार घेऊया, असा विश्वास गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग, विप्ला फाउंडेशन व एसीटी (अलायंस अगेंस्ट सेंटर्स ऑफ ट्राफीकिंग) यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती येथील वसंतराव नाईक सभागृहात आयोजित "महिलांच्या व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणारी तस्करी रोखण्याबाबत” आयोजित चर्चासत्र व परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री फडणवीस उपस्थित होते.या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, एनडीआरएफचे माजी महासंचालक पी.एम. नायर, नागपुरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, महिला व बालविकास विभागाच्या उपायुक्त अपर्णा कोल्हे आदी मंचावर उपस्थित होत्या.