Home / Initiatives
२५ जानेवारी १९९३ साली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रूपाने देशातील पहिल्या महिला राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्यानंतर आज देशभरातील अनेक राज्यांचा स्वतंत्र महिला आयोग आहे. महिला आयोगाच्या माध्यमातून गेल्या २९ वर्षात राज्यातील अनेक महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम केलं जात आहे, यात अनेक अत्याचाऱ्याचा घटना, महिलांचे प्रलंबित खटले, महिला हक्कांची जनजागृती अशा अनेक मुद्यांवर महिला आयोग गेली ३ दशक अविरतपणे काम करत आहे.यावेळी राज्य महिला आयोगाच्या १५५२०९ या टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात आले तसेच आयोगाच्या कॅलेंडर तसेच डायरीचे देखील अनावरण करण्यात आले. १५५२०९ हा टोल फ्री क्रमांक पुढील सात दिवसांमध्ये कार्यान्वित होईल यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर,खा.सुप्रिया सुळे,पोलीस महासंचालक संजय पांडे,माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे,राज्य आयोगाच्या माजी अध्यक्षा निर्मला सामंत प्रभावळकर, प्रियांका सावंत तसेच माजी आयोगाचे माजी सदस्य सचिव देखील उपस्थित होते.