Home / Initiatives
राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत आज ठाणे जिल्ह्यात जनसुनावणी घेतली.
नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या सुनावणीला माझ्यासह आयोगाच्या सदस्या ॲड गौरी छाब्रिया, उत्कर्षा रूपवते, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सीईओ मनुज जिंदल, पंजाबराव उगले अतिरिक्त आयुक्त ठाणे शहर, विनायक वत्स सहायक आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड उपस्थित होते.
समुपदेशक, पोलीस, विधी अधिकारी यांचा सहभाग असलेले ५ पॅनल तयार करून एकाच वेळी आज एकुण १७८ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.