| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

महिला आयोगातर्फे पाँश कायद्याचा आँनलाईन अभ्यासक्रम आयोग कर्मचारर्यांनी पुर्ण केले प्राथमिक प्रशिक्षण


मुंबई दि. ७ फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि सँफ फाउँडेशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कामाच्या ठिकाणी लैगिक छळ प्रतिबंध कायदा (POSH) बाबत जनजागृती करणारा आँनलाईन प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येत असून आज राज्य महिला आयोगाच्या कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

कामाच्या ठिकाणी लैगिक छळ प्रतिबंध कायदा २०१३ बाबत नोकरदार वर्ग, जनसामान्यात जागृती व्हावी यासाठी राज्य महिला आयोग आणि सँफ फाउँडेशन, इंडिया यांनी सशुल्क आँनलाईन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु केला असुन नोंदणीनंतर एका महिन्यात सदर प्रशिक्षण पुर्ण करता येते. या अभ्यासक्रमात कामाच्या ठिकाणी लैगिक छळ म्हणजे काय? अंतर्गत तक्रार निवारण समितीची संरचना, आदर्श कार्यपद्धत, तक्रार असताना पिडितेची तसेच सहकार्यांची भुमिका आणि कायद्याबाबत प्राथमिक माहितीचा समावेश आहे. आकर्षक व्हिडिओच्या माध्यमातुन प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये www.safindia.academy या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ४५ मिनिटांचे प्राथमिक प्रशिक्षण नोकरी करणार्या प्रत्येकाला मुलभुत माहिती देणारे आहे तर ७ तासांचे प्रशिक्षण हे अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्य, संस्थांचे संचालक/मालक अशांसाठी उपयुक्त आहे.

बांद्रा येथील कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या कर्मचारी वर्गासाठी प्राथमिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे नोकरी करताना आपल्यासाठी असलेले कायदे, आपले हक्कबाबत माहिती मिळाली अशी प्रतिक्रिया श्रद्धा खांडेकर यांनी दिली. समुपदेशक म्हणुक काम करत असूनही अजुन सहज भाषेत लिंगभाव, मानसिकता तसेच कायदा कसा समजावून सांगावा याचा अनुभव मिळाला असे समुपदेशक लक्ष्मण मानकर यांनी सांगितले तर प्रशासनात काम करणार्या व्यक्तीची अशा तक्रारीप्रसंगी काय भूमिका असावी याची माहिती मिळाल्याचे मानसी जोशी यांनी सांगितले.

यावेळी आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लूथरा, लेखाधिकारी दि ह सावंत, वरिष्ठ समुपदेशक अंजनी काकडे आणि सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


u-1
u-2
u-3

u-1