राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांनी आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली
यावेळी मा.रेखा शर्मा यांना आयोगाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची , वेगवेगळ्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा 155209 या टोल फ्री क्रमांकांवर त्यांनी स्वतः फोन करून माहिती देखील घेतली तसेच आयोगाच्या सादर करण्यात आलेल्या कार्यअहवालावर त्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय महिला आयोग कार्यालय दिल्ली येथे सदिच्छा भेटीचे निमंत्रण देखील त्यांनी दिले.