Home / Initiatives
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अति. अधीक्षक अजय देवरे, सीईओ अभिनव गोयल, जिल्हा महिला बाल विकास अधिकैरी गिरी, आयोगाचे समन्वयक गंगापुरे आदी उपस्थित होते.
आजच्या बैठकीत जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग, परिवहन, शिक्षण या विभांगानी आपल्या कामाचे सादरीकरण केले.
लातूर जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शानात आरोग्य विभाग ‘संजीवनी’ महिलांसाठी कॅन्सर निदान चाचणी उपक्रम राबवत आहे. यात महिलांनी चाचणीसाठी तयार व्हाव, केंद्रावर यावे यासाठीही सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. लातूर महापालिका हद्दीत सिटीबसने मोफत प्रवास हे ही महिलांची क्रयशक्ती वाढवणारे प्रयत्न आहेत.
पोलीस अधीक्षक राबवत असलेले स्टुडंट पोलिस कॅडेट, व्हाटस अप ग्रुप द्वारे जनजागृती संपर्क, सोशल मिडियाचा गैरवापर केल्यास समुपदेशन करुन साभार परत प्रमाणपत्र देत प्रबोधन असे प्रयत्न नक्कीच अनुकरणीय आहेत.
कौतुक करत असतानाचा ज्या त्रुटी आहेत, उणिवा आहेत त्याची ही जाणीव प्रशासनाला आज करुन दिली आहे. लातूर मधील खासगी कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीबाबत विभागाची उदासीनता, शाळामधील अंतर्गत तक्रार निवारण समितीची अद्ययावत माहिती नसणे या बाजू प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत १ महिन्यात आयोगास अहवाल देण्याचे निर्देश दिले.
पिंक बॅाक्सची व्याप्ती वाढवणे, शाळेतील मुलींना दामिनी पथकाबाबत फार माहिती नाही नसल्याने दर महिन्याला शाळेत दामिनी पथकाने संवाद साधावा, समान काम समान वेतन बाबत जनजागृती करावी अशा काही सुचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.ावी अशा काही सुचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.