उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बाल विकास अनुषंगाने घेतलेली आढावा बैठक.
आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बाल विकास अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॅा सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाउ गलांडे तसेच शिक्षण, कामगार, परिवहन, जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील निधी अभावी बंद समुपदेशन केंद्र तातडीने सुरु करावी. महिलांना तात्पुरता निवारा देणारे वन स्टॅाप सेंटरचे काम पुर्ण करावे तसेच मध्यवर्ती कार्यालयात असलेले महिला सहाय कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थलांतरित करावे अशा सुचना आज संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी बालविवाह रोखण्यासाठी सुरु केलेले खुशखबरी उपक्रम, आरोग्यदायी पिढीसाठीचे ॲनिमियामुक्त युवा,
पोलीस अधीक्षकांचे पिंक पथक हे उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहेत.