Home / Initiatives
३१ ऑक्टोबर २०२१ रोजी कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील खोची येथे एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या मुलीच्या कुटुंबीयांची आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar यांनी खोची येथे सांत्वनपर भेट घेतली.
ही घटना घडल्याच्या दिवसापासून महिला आयोगाच्या अध्यक्षा संबंधित पोलीस प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात होत्या. सदर प्रकरणातील आरोपीला अटक झाली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि पिडीत कुटुंबियांना मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला.
या प्रकरणाचा तपास जलदगतीने चालू असून येत्या काही दिवसात या प्रकरणाची चार्जशीट कोर्टामध्ये दाखल होत आहे. या चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.