Home / Initiatives
६ मार्च २०२४,
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित सन्मान 'ती' चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सन्मान 'ती' चा सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले जेष्ठ नेते, खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार केला. आयोगाने सोडविलेल्या यशस्वी प्रकरणाचे कॉफी टेबल बुक 'उजेडवाटा' चे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय सेवेत ३० वर्ष कार्य करणाऱ्या डॉ. रागिणी पारेख, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एस.एन.डी.टी च्या प्राध्यापिका डॉ.चित्रा लेले, आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे यावेळी उपस्थित होत्या.