Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी आज, शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोग कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्याने आयोग कार्यालयात डिजीटल स्री शक्ती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रीया, सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, विमा संचलनालयाचे सहायक विमा संचालक श्री स्वप्निल खुराटे या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास राज्य महिला आय़ोग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, म्हाडा कार्यालय, विमा संचलनालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महिलांना सायबर साक्षर आणि सुरक्षित करणार्या डिजीटल स्त्री शक्ती व्याख्यानात रिस्पाँन्सिबल नेटिझम संस्थेच्या संस्थापक श्रीमती सोनाली पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. मोबाईल, इंटनेट रोजच्या जगण्याचा भाग झाला असताना आता सेक्सटाँर्शन, डिजीटल अरेस्ट, आँनलाईन लैंगिक छळ, सायबर ग्रुमिंग अशा प्रकारच्या गुन्ह्यातून महिलांची, कुटुंबांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर जगातील फसवणूकीचे हे प्रकार, त्यास बळी पडू नये म्हणून घ्यावयाची काळजी तसेच प्रसंगी फसवणूक झालीच तर त्याबाबत संबंधित यंत्रणांना कळवणे, मदत उपलब्ध होणे या दृष्टीने या व्याख्यानात श्रीमती पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. सायबर फसवणूक झाल्यास न घाबरता, समाज भिती न बाळगता सायबर हेल्पलाईन १९३० किंवा cybercrime.gov.in वर संपर्क साधून मदत मिळवता येते याबाबत ही मार्गदर्शन केले.