Home / Initiatives
श्री शिवाजी विद्यालय, शहर शाखा अकोला येथे १२ ऑक्टोबर् रोजी, देऊन विद्यार्थ्यांच्या समवेत संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या समवेत महिला सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरारी पथक, बिट मार्शल या बद्दल माहिती दिली, तसेच महिला सुरक्षिततेसाठी असलेला टोल फ्री क्रमांक सांगितला.
यावेळी आ.अमोलजी मिटकरी, महानगराध्यक्ष राष्ट्रवादी श्री. विजयराव देशमुख, जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णाभाऊ अंधारे, जिल्हाध्यक्ष रुपालीताई वाकोडे, सोनालीताई ठाकूर, सुषमाताई निचळ, उज्वलाताई राऊत, अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख, मुख्याध्यापक मनोज देशमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.