Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित आरोग्यवारी उपक्रमाअंतर्गत आज सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील वारीमार्गावर महिलांसाठी उभ्या करण्यात आलेल्या स्वच्छतेच्या सुविधांची पाहणी करण्यात आली. यामध्ये महिला आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा प्रशासनाने महिला वारकऱ्यांसाठी विसावा कक्ष , स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष , सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, बर्निंग मशीन यांची वारी मार्गावर अतिशय उत्तम सोय केलेली आहे.
महिला वारकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या आरोग्यवारी उपक्रमाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. महिला वारकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा तसेच यासंबधातील काही सूचना किंवा प्रतिक्रिया असतील तर आपण राज्य महिला आयोगास संपर्क साधू शकता.