Home / Initiatives
राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. महिला व बालकांचे प्रश्न, महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, महिला विरोधातील गुन्हे आणि त्याचा तपास याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महिला बाल विकास, कामगार, परिवहन, आरोग्य, पोलीस, शिक्षण अशा विविध विभागांची माहिती घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीला सदस्या ॲड. गौरी छाब्रिया, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सीईओ मनुज जिंदल, पंजाबराव उगले अतिरिक्त आयुक्त ठाणे शहर, विनायक वत्स सहायक आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, ठाणे महापालिका उपायुक्त गोदापुरे, वर्षा दीक्षित उपस्थित होते.