| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

PUBLIC HEARING OF 45 COMPLAINTS IN AHMEDNAGAR DISTRICT.


अहमदनगर जिल्ह्यातील 45 तक्रारींची जनसुनावणी

विभक्त होण्याच्या मार्गावर असलेली सहा जोडपी पुन्हा संसारात रमली


अहमदनगर दि. 12 :


महिलांच्‍या सक्षमीकरणासाठी राज्‍य महिला आयोग प्रयत्‍नशील असल्‍याचे सांगतानाच महिलांना न्‍याय मिळावा यासाठी महिला आयोग आपल्‍या दारी हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून महिलांचे प्रश्‍न, अडचणींची सोडवणूक होईल व महिलांना न्‍याय मिळेल, असा विश्‍वास राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्‍यक्‍त केला.


जिल्‍हा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण व बालगृह येथे महिला आयोग आपल्‍या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणीवेळी मार्गदर्शन करतांना श्रीमती रहाटकर बोलत होत्‍या. यावेळी उपजिल्‍हाधिकारी ज्‍योती कावरे, बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख, परिविक्षा अधिकारी संध्‍या राशीनकर, कोल्‍हापूरचे जिल्‍हा समन्‍वयक आनंदा शिंदे, प्रकल्‍प अधिकारी कशकिना शरिफ, पोलिस उपनिरिक्षक कल्‍पना चव्‍हाण, समुपदेशक अनिता कंगणे, प्रज्ञा हेंद्रे, भानुदास बेरड आदी उपस्थित होते. 


श्रीमती रहाटकर म्‍हणाल्‍या, समाजातील महिलांचे जीवनमान उंचावे व महिलांना सन्‍मान मिळावा यासाठी राज्‍य महिला आयोग अविरत प्रयत्‍न करत आहे. महिलांना न्‍याय मिळावा यासाठी महिला आयोग आपल्‍या दारी हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे. यामध्‍ये विभागस्‍तरावर महिलांच्‍या तक्रारीचे निवारण करण्‍याचा प्रयत्‍न आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबई येथील कार्यालयात येऊन तक्रार करणे व सुनावणीसाठी उपस्थित रहाणे आर्थिकदृष्‍टया तसेच इतर कारणांमुळे शक्‍य होत नाही. त्‍यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्‍या दारी अंतर्गत सुनावणी दरम्‍यान नव्‍या तक्रारीवर त्‍याच ठिकाणी कार्यवाही करण्‍यात येते. त्‍यामुळे आपली समस्‍या मांडणा-यांना त्‍वरीत दिलासा देण्‍याचे काम आयोगाद्वारे करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. समुपदेशन करुन समस्‍या सोडविण्‍यासाठी आयोग काम करत असल्‍याचे सांगतानाच वर्षभरात 1500 वर तक्रारी मार्गी लावण्‍यात आयोगाला यश आले आहे. यातून अनेक कुटूंब पुन्‍हा एकत्र आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यावेळी पोलिस प्रशासन, विधीसल्‍लागार, समुपदेशक, जिल्‍हा समन्‍वयक उपस्थित होते.


u-1
u-2
u-3