Home / Initiatives
महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोग आणि ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतल्या 30 महाविद्यालयात ‘यंग इंडिया अनच्नेड’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याद्वारे मुंबईतील महाविद्यालयात अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग क्लब स्थापन करण्यात येणार असून विद्यार्थ्याना महिलांच्या बाबतीत घडणार्या गुन्ह्यांबाबत जागरुक करत त्यांचा समाज प्रबोधनात सहभाग वाढवणे, महिला व बालकांविरोधात होणार्या विविध प्रकारच्या गुन्हयांबाबत अवगत करणे, महाविद्यालयीन कँम्पस तरुणींसाठी सुरक्षित असेल या दृष्टीने प्रयत्न करणे, गुन्हा घडल्यास तरुणांनी त्याबाबत आवाज उठवावा विविध समाज घटकांशी तरुणांचा संवाद घडवून आणणे अशी विविध उदिष्ट या उपक्रमाद्वारे पुर्ण करण्यावर भर राहणार आहे.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, सदस्या उत्कर्षा रुपवते, सामाजिक संस्थेचे महेश ठाकरे यासह विविध संस्थांचे, महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वातावरणात आपला विकास करता आला पाहिजे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी समाज प्रबोधन देखील काळाची गरज आहे अशी भावना मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
अध्यक्ष श्रीमती चाकणकर यांनी आयोगाच्या मदतीने 24 मुलींची ओमान मधून सुटका करून त्यांना महाराष्ट्रात आणण्याच्या प्रयत्नाबाबत माहिती दिली. विधवा महिला, बालविवाह, हुंडा प्रथा अशा अनेक प्रश्नांवर महिला आयोग काम करत असून ‘यंग इंडिया अनच्नेड’ हा उपक्रम सर्वांसाठी एक सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी मदत करेल, असे सांगितले.