Home / Initiatives
वाशिम जिल्ह्यात जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. पोलीस, महिला व बाल विकास, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांनी आपली माहिती सादर केली. बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणांनी सजगतेने काम करावे. हिरकणी कक्ष, महिला स्वच्छतागृहे बाबत ची कागदावरची आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात फरक आहे. त्यामुळे कागदावर हिरकणी कक्ष, महिला स्वच्छतागृहे दिसत असली तरी प्रत्यक्षात ती महिलांना वापरता यावी, सुस्थितीत असावी याकरिता तातडीने कारवाई करावी अशा सूचना यावेळी दिल्या.